Advertisement

माहीम आणि दादरमध्ये पालिकेद्वारे मोफत कोरोना अँटिजेन चाचणी

१ सप्टेंबरला जाता नसेल आलं तर तुम्ही २ सप्टेंबरला या ठिकाणी जाऊन मोफत कोरोना चाचणी करू शकता.

माहीम आणि दादरमध्ये पालिकेद्वारे मोफत कोरोना अँटिजेन चाचणी
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. कोरोना रूग्ण शोधण्यासाठी पालिकेनं मुंबईत घरोघरी जाऊन लोकांची तपासणी केली. याशिवाय वैद्यकीय शिबिरे उभारली. कोरोनाचा हॉटस्पॉट मानल्या जाणाऱ्या दादर आणि माहीम भागात पालिकेनं १ आणि २ सप्टेंबर रोजी COVID 19 साठी मोफत अँटिजेन चाचणी शिबिराची स्थापना केली आहे.

१ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११.३० आणि बैगुलबाई भागात सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत दादरच्या गोखले रोडवर शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर २ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११.३० या वेळेत माहीमच्या वेलकरवाडी आरोग्य चौकी आणि सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत वेलकरवाडी दवाखान्यात चाचणी होणार आहे.

मुंबईमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी राज्यात कोरोनामुळे कमीतकमी १८४ जणांचा मृत्यू झाला. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. मात्र, मुंबईत पालिकेला (BMC) कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आलं आहे.

सोमवारी मुंबईत १ हजार १७९ नवीन रुग्ण आढळले. सोमवारी मुंबईत कुरानमुळे किमान ३२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनामधील वाढत्या मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यात राज्यात यश आलं आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोनामुळे ३२ रुग्णांचा मृत्यू झाला.हेही वाचा

'या' ५ जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण ४०० टक्के

मुंबईत कंटेन्मेंट झोनची संख्या घटून ५५४ वर, 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय