नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन २८९ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (३१ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन २८९ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २६,१४९ झाली आहे.

सोमवारी बेलापूर ३६, नेरुळ ५५, वाशी ७०, तुर्भे ३४, कोपरखैरणे ४५, घणसोली १७, ऐरोली २९, दिघामध्ये ३ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ५३, नेरुळ ६५, वाशी ५१, तुर्भे ३७, कोपरखैरणे ५३,  घणसोली ८४, ऐरोली ४४ आणि दिघामधील ४ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२१०८ पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५८८ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३४५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८५ टक्के झाला आहे. नवी मुंबई पालिकेने स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू केल्यानंतर १ हजार चाचण्यांची क्षमता असलेल्या प्रयोगशाळेत दिवसाला ९७० पर्यंत चाचण्या केल्या जात आहेत.

ऑगस्टनंतर करोना साथीची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने खासगी रुग्णंलयाना जास्तीत जास्त कोविड पुनर्वसन केंद्र उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वाशी येथील फोर्टिज हिरानंदानी या रुग्णालयाने चाळीस खाटांचे केंद्र उभे केले आहे. फोर्टिज रुग्णालयाबरोबर पालिकेने एमजीएमचे सानपाडा येथील नियोजित रुग्णालय ताब्यात घेतेल असून त्या ठिकाणी प्राणवायू पुरवठा होईल अशा यंत्रणा उभी केली आहे.


हेही वाचा

'या' योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत कोरोनावर मोफत उपचार

'या' ५ जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण ४०० टक्के


पुढील बातमी
इतर बातम्या