कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णसंख्या २९ हजारांच्या वर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाचे नवीन ३७८ रुग्ण आढळले आहेत. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता २९,०१५ झाली आहे. 

गेल्या २४ तासांत ४२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या येथे यामध्ये ३१३४ रुग्ण उपचार घेत असून २५,२५१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ६३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ५५, कल्याण पश्चिम ९२, डोंबिवली पूर्व १२१, डोंबिवली पश्चिम ८३, मांडा टिटवाळा ८, मोहना ३, तर पिसवली येथील १६ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७७ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, १४ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा

'या' योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत कोरोनावर मोफत उपचार

'या' ५ जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण ४०० टक्के


पुढील बातमी
इतर बातम्या