नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २९८ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (२५ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन २९८ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २३,९२७ झाली आहे.

मंगळवारी बेलापूर २२, नेरुळ ८६, वाशी ६१, तुर्भे ३६, कोपरखैरणे ३२, घणसोली ३५, ऐरोली २४ आणि दिघामध्ये २ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ३६, नेरुळ ६१, वाशी ३२, तुर्भे ५३, कोपरखैरणे ५९, घणसोली ५०, ऐरोली ७३ आणि दिघामधील ४ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २००३६ पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५५१ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३३४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८४ टक्के झाला आहे. नवी मुंबई पालिकेने स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू केल्यानंतर १ हजार चाचण्यांची क्षमता असलेल्या प्रयोगशाळेत दिवसाला ९७० पर्यंत चाचण्या केल्या जात आहेत. आजवर  १ लाखापेक्षा अधिक नागरिकांच्या प्रतिजन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईतील अद्ययावत प्रयोगशाळेबाबत  पनवेल, नागपूरमधून विचारणा करण्यात येत आहे. शहरात प्रतिदिन १ हजार चाचण्यांचे लक्ष्य असून जवळजवळ दिवसाला ९७० चाचण्या केल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करणे हे लक्ष्य असल्याचं पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितलं.


हेही वाचा -

विलगीकरण केंद्रातला आनंदोत्सव करतोय मनावरील ताण हलका!

१६ रुग्णालयांवर केडीएमसीची कारवाई, कोरोना रुग्णांकडून अधिक बिल आकारलं 


पुढील बातमी
इतर बातम्या