नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ३०३ रुग्ण

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ३०३ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १२ हजार २६९ झाली आहे.  

बुधवारी बेलापूर ३५, नेरुळ ६०, वाशी २६, तुर्भे ११, कोपरखैरणे ५८, घणसोली ५५, ऐरोली ४७, दिघामध्ये ११ नवे रुग्ण आढळले आहेत.  दिवसभरात २०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ३०, नेरुळ २३, वाशी २८, तुर्भे ११, कोपरखैरणे २६, घणसोली ४४, ऐरोली ३३, दिघामध्ये १२ नवे रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७९२५ वर पोहोचली आहे.  नवी मुंबईत सध्या ३९८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवी मुंबईत लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसंच पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रार्दुभाव संपेपर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांसह आठवड्यातील सातही दिवस कामावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. 


हेही वाचा - 

मुंबई कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण, दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण


पुढील बातमी
इतर बातम्या