नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ३३३ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (१८ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन ३३३ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २१,४७३ झाली आहे.

 मंगळवारी बेलापूर ४७, नेरुळ ५४, वाशी ३४, तुर्भे १८, कोपरखैरणे ४९, घणसोली ६७, ऐरोली १८ आणि दिघामध्ये १६ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ४०४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ४६, नेरुळ ७५, वाशी ४३, तुर्भे ४३, कोपरखैरणे ६७, घणसोली ७१, ऐरोली ५१ आणि दिघामधील ८ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७५३० पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५१५ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३४२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  नवी मुंबईत आतापर्यंत ७ हजार ९८० प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. येथे एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८० टक्के झाला  आहे. 


हेही वाचा -

हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे द्या, राऊतांचं भाजपला आव्हान

मग, संजय राऊत बोलत असल्यानेच संशय वाढलाय- नारायण राणे


पुढील बातमी
इतर बातम्या