पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ३५ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (२८ डिसेंबर) ३५ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ९,  नवीन पनवेल १०, खांदा काॅलनी २, कळंबोली १, कामोठे ४, खारघर ८,  तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ६, नवीन पनवेल २, कळंबोली ३, कामोठे १, खारघर येथील १७ रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २७३९४ कोरोना रूग्णांपैकी २६५०१ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५९७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २९६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा -

मुंबई लोकलमध्ये होणार 'कोरोना'बाबत जनजागृती

जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य; मनसेची पत्राद्वारे पश्चिम रेल्वेकडे मागणी


पुढील बातमी
इतर बातम्या