नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ३८२ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (२८ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३८२ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ३५,९३४ झाली आहे.

सोमवारी  बेलापूर ६७, नेरुळ ४७, वाशी ५३, तुर्भे ४६, कोपरखैरणे ५५, घणसोली ४८, ऐरोली ६४, दिघामध्ये २ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३१९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ४१, नेरुळ ७०, वाशी ३७, तुर्भे ५३, कोपरखैरणे ४८,  घणसोली २९, ऐरोली ३९, दिघामधील २ बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१६७२ झाली आहे. तर मृतांचा आकडा ७४० झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३५२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८८ टक्के झाला आहे. शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा -

मुंबईतील कोरोनामुक्तांचं प्रमाण ८२ टक्क्यांवर

लाॅकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी राज्यात २ लाख गुन्हे दाखल


पुढील बातमी
इतर बातम्या