पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ४१ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (२९ डिसेंबर) ४१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच पनवेलमधील एका मृत्यूची नोंद झाली आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ५,  नवीन पनवेल १२, खांदा काॅलनी १, कळंबोली १, कामोठे ११, खारघर १०,  तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ३, नवीन पनवेल ५, कळंबोली १, कामोठे ४, खारघर येथील ११ रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २७४३५ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २६५२५ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५९८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३१२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा -

कोरोनाबाधितांसाठी आरोग्य व्यवस्था उभारण्याकरिता महापालिकेला आतापर्यंत १,४७० कोटींचा खर्च

'फ्री' काश्मिर प्रकारणात पोलिसांकडून ‘सी’ समरी अहवाल सादर


पुढील बातमी
इतर बातम्या