नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ४१९ रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी (४ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ४१९ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २७,५३१ झाली आहे.

शुक्रवारी बेलापूर ३५, नेरुळ १०३, वाशी ६७, तुर्भे ५१, कोपरखैरणे ३५, घणसोली ७२, ऐरोली ५४, दिघामध्ये २ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ३६, नेरुळ ७४, वाशी ५७, तुर्भे ४१, कोपरखैरणे ४९,  घणसोली ३२, ऐरोली ५१ आणि दिघामधील ३ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३२७६ झाली आहे. तर मृतांचा आकडा ६१५ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३६४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८५ टक्के झाला आहे. नवी मुंबईत ४ हजार ३५८ खाटांची संख्या आता ५ हजार ३५८ वर पोहोचली आहे. वाशी येथील निर्यात भवन महिला रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तुर्भे येथील राधास्वामी सत्संग भवन येथेही १ हजार प्राणवायूयुक्त खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. तर आणखी तेराशे खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.


हेही वाचा -

राज्यात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांच्या वर


पुढील बातमी
इतर बातम्या