राज्यात ४२ हजार नवे रुग्ण, ५४ हजार रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात गुरुवारी ४२ हजार ५८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ५४ हजार ५३५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा  ५१ लाख ६९ हजार २९२ झाला आहे. यापैकी ४६ लाख ५२ हजार ७३१ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७८ हजार ८५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  सध्या महाराष्ट्रात ५ लाख ३३ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत गुरूवारी १ हजार ९४६ रुग्ण आढळले.  तर ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच २ हजार ३७ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ टक्के आहे. आतापर्यंत ६ लाख २९ हजार ४१० रुग्ण बरे झाले आहेत.  सध्या मुंबईत ३८ हजार ६४९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर १८९ दिवस आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने १ जूनपर्यंत निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यात काही नव्या निर्बंधांचादेखील समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाने जाहीर केले असून सध्याच्या निर्बंधांसह नवे निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असतील, असं म्हटलं आहे.



हेही वाचा -

१८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण स्थगित

मुंबईत 'म्युकरमायकोसिस'चे आढळले १११ रुग्ण

पुढील बातमी
इतर बातम्या