Advertisement

राज्यात १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण तूर्तास स्थगित

अखेर १८ ते ४४ या वयोगटाच्या लसीकरणाची मोहीम तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

राज्यात १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण तूर्तास स्थगित
SHARES

मुंबईत (mumbai) कोरोना प्रचंड वाढत असून, यावर लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लशींचा पुरेसा साठा नाही. त्यामुळं आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांमध्ये सतत वादाचे चित्र समोर येत होतं. त्यामुळं अखेर १८ ते ४४ या वयोगटाच्या लसीकरणाची मोहीम तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला असून, ४५ वर्षांवरील नागरिकांना लशीची दुसरी मात्रा प्राधान्यानं दिली जाणार आहे. शिवाय, पुढील काही दिवस या वयोगटातील नागरिकांना पहिली मात्राही दिली जाणार नाही. लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरणाला गती देता येत नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी स्पष्ट केले.

देशातील १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे १ मेपासून लसीकरण सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. केंद्राकडून होणारा लशींचा अपुरा पुरवठा तसेच लशींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी तातडीनं पुरेशा लशी पुरविण्याबाबत असमर्थतता व्यक्त केल्यानं १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण १ मेपासून केले जाणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते.

पुरेसा साठा नसल्यानं १८ ते ४४ वयोगटांचं लसीकरण नंतर सुरू करावे, असा आरोग्य खात्याचाही प्रस्ताव होता. मात्र केंद्राच्या आग्रहामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी १ मेपासून राज्यात १८ ते ४४ वयोगटांतील ठरावीक जणांचं लसीकरण सुरू केले जाईल, असे जाहीर केले. त्यानुसार लसीकरण सुरूही झाले होते. पण गेल्या काही दिवसांपासून केंद्राकडून लशींचा पुरेसा पुरवठाच झालेला नाही.

लसीकरणावरून राज्यभरात आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांमध्ये खटके उडत आहेत. त्यातच ४५ वर्षांपुढील लाखो नागरिकांना पात्र असूनही लशीची दुसरी मात्रा मिळत नसल्यानं लोकांमध्ये संताप आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही सर्वत्र लस मिळत नव्हती. लशींचा साठा उपलब्ध न होणं, तरुण वर्गात सरकारबद्दल निर्माण होणारी नाराजी यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्त स्थगित करण्याचा निर्णय झाल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारकडून पुरेशी लस मिळत नसल्याने आता राज्याने खरेदी केलेली लस ४५ वर्षांपुढील नागरिकांना देण्यात येणार आहे. दुसऱ्या मात्रांसाठी राज्यात कोव्हिशिल्डच्या १६ लाख तर कोव्हॅक्सिनच्या ४ लाख मात्रांची गरज आहे.

सरकारकडे कोव्हिशिल्डच्या ७ लाख आणि कोव्हॅक्सिनच्या ३ लाख अशा १० लाख मात्रा उपलब्ध असून पुढील ४ दिवस केवळ दुसऱ्या मात्रांसाठीच लसीकरण केलं जाणार आहे. त्यासाठी ४५ वर्षांपुढील नागरिकांनाही पहिली मात्रा घेण्यासाठी आठवडाभर थांबावं लागेल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.



हेही वाचा -

राज्यात कोरोनाचे ४६ हजार ७८१ नवे रुग्ण

सीरम इन्स्टिटयूट सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा