Advertisement

राज्यात कोरोनाचे ४६ हजार ७८१ नवे रुग्ण

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ४६ हजार १२९ झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ०३ हजार ६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात कोरोनाचे ४६ हजार ७८१ नवे रुग्ण
SHARES

राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ४६ हजार ७८१ रुग्ण आढळले. तर  ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यातील  एकूण रुग्णांचा आकडा ५२ लाख २६ हजार ७१० झाला आहे. यापैकी ४६ हजार १९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ७८ हजार ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५ लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत बुधवारी २११६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४२९३ रुग्ण बरे झाले आहेत. याशिवा ६६ मृत्यूंची नोंद झाली. मुंबई सध्या ३८८५९ अॅक्टिव्ह रुग्ण  आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधी १७६ दिवसांवर गेला आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ४६ हजार १२९ झाली आहे.  पुणे जिल्ह्यात  सर्वाधिक १ लाख ०३ हजार ६७  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या ३१ हजार ३४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ४९ हजार ३४५ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार ७८८ इतकी आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ०१ लाख ९५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२ लाख २६ हजार ७१० (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६ लाख १३ हजार व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २९ हजार ४१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.हेही वाचा - 

सहकारी बँक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी मुभा नाही

देशात प्रवासासाठी RT-PCR चाचणी बंधनकारक नाही

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा