Advertisement

देशात प्रवासासाठी RT-PCR चाचणी बंधनकारक नाही

केंद्र सरकारनं मंगळवारी कोरोना टेस्टिंगबाबतच्या नियमावलीत काही बदल केले आहेत.

देशात प्रवासासाठी RT-PCR चाचणी बंधनकारक नाही
SHARES

देशभरात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. परंतु, आता प्रवासासाठी चाचणी करणे आवश्यक नसल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत केंद्र सरकारनं मंगळवारी कोरोना टेस्टिंगबाबतच्या नियमावलीत काही बदल केले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्य सरकारांनी आपल्या राज्यात प्रवेश करण्यासाठी RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक करण्यात आलं होतं. विशेषतः महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांना अन्य राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या आठवड्यात एका दिवसात ४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली होती. मात्र, चालू आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलाय. देशातील १८ राज्य आणि केंद्राशासित प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नियमावलीत शिथिलता देण्यात आली.

कोरोनाबाबत केंद्राच्या नव्या नियमावलीनुसार कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना आता RT-PCR टेस्ट बंधनकारक नसेल. मात्र, डिस्चार्ज मिळवताना रुग्णाच्या कोरोना लक्षणांमध्ये मोठी सुधारणा गरजेची आहे. कोरोना रुग्णाला ५ दिवसांपासून ताप नाही, तर त्याला रुग्णालयातून सुट्टी घेताना RT-PCR टेस्ट करणं गरजेचं नसेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा