
या प्रशिक्षणादरम्यान चालकांना हाय-स्पीड ट्रेन चालवण्याच्या तांत्रिक आणि ऑपरेशनल बाबींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. जपानच्या प्रसिद्ध शिंकान्सेन प्रणालीवर आधारित ट्रेन ऑपरेशन, सुरक्षा प्रक्रिया आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण त्यांना मिळणार आहे.
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी जपानकडून तांत्रिक सहकार्य घेतलं जात आहे. त्यामुळे भारतीय चालकांना थेट जपानमध्ये जाऊन हाय-स्पीड रेल्वेच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीचा अनुभव मिळणार आहे.
या प्रशिक्षणामुळे भारतीय कर्मचाऱ्यांना जपानमध्ये विकसित झालेल्या उच्च दर्जाच्या सुरक्षा मानकांची आणि बुलेट ट्रेनच्या ऑपरेशनची प्रत्यक्ष माहिती मिळेल.
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर 16 चालकांचं हे प्रशिक्षण महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
हेही वाचा
