Advertisement

सीरम इन्स्टिटयूट सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल

‘कोव्हिशिल्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

सीरम इन्स्टिटयूट सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल
SHARES

भारतातील ४१८ भारतीय कंपन्यांनी सन २०१९-२० मध्ये पाच हजार कोटींहून अधिक रक्कमेचा एकूण व्यापार केला आहे. यामध्ये ‘कोव्हिशिल्ड’ (Covishield) ही कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) सर्वाधिक नफा (Profit) कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

कॉर्पोरेट कंपन्याच्या व्यवहारासंदर्भात माहिती ठेवणाऱ्या कॅपिटलाइननं या संदर्भातील अहवाल सादर केला आहे.

लाइव्ह मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, ५ हजार ४४६ कोटींच्या विक्रीच्या मोबदल्यात सीरमनं दोन हजार २५१ कोटींचा निव्वळ नफा कमवला आहे. नेट मार्जिनच्या ४१.३ टक्के एवढा हा नफा आहे.

अर्थपुरवठा करणाऱ्या कंपन्या (सिटी बँक, मुथूट फायनान्स सारख्या) या यादीमध्ये प्रामुख्याने तळाला आहेत. मोनोपोली ऑप्रेशन्स क्षेत्रात काम करणाऱ्या (हिंदुस्तान झिंक अ‍ॅण्ड न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनसारख्या) कंपन्या आहेत.

पाच हजार कोटींचा उद्योग करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये १८ कंपन्या या औषध क्षेत्राशी संबंधित आहेत. मॅकलेओड्स फार्मास्युटीकल्सचा या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर समावेश आहे. २८ टक्के नफा या कंपनीनं कमावला आहे.

सीरम कंपनीच्या नफ्याची टक्केवारी अधिक असण्यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे भारतामध्ये कंपनी कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करत आहे. जगामध्ये सध्या सर्वाधिक लसीची गरज भारतालाच असल्यामुळे जगातील सर्वात मोठी औषध निर्मिती करणारी सीरम ही सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी ठरली आहे.

हॉर्स ब्रीडींग, बांधकाम व्यवसाय, अर्थसहाय्य, हवाई श्रेत्र यामध्येही सीरमची मालकी असणाऱ्या पुनावाला समुहानं गुंतवणूक केली आहे. सीरमचा महसूल २००८-०९ आणि २०१५-१६ दरम्यान २३ टक्कांनी वाढून वार्षिक स्तरावर ४ हजार ६३० कोटींवर पोहचला.

तर निव्वळ नफ्यात २८ टक्के वाढ होत, तो १२ हजार १९१ कोटींवर पोहचला. पण सन २०१५-१६ ते २०१९-२० दरम्यान कंपनीच्या महसुलामध्ये चार टक्क्यांनी घट झाली आणि निव्वळ नफाही या वर्षांमध्ये कायम राहिला.



हेही वाचा

पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरूच, मुंबईत आहे 'इतका' दर

बेरोजगारीचा उच्चांक, लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये ७५ लाख लोकांनी गमावल्या नोकऱ्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा