Advertisement

पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरूच, मुंबईत आहे 'इतका' दर

देशात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी इंधनांच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरूच, मुंबईत आहे 'इतका' दर
SHARES

देशात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी इंधनांच्या दरात वाढ करण्यात आली आहे.  पेट्रोलची किंमत २६ पैशांनी तर डिझेलची किंमत ३१ पैशांनी वाढवण्यात आली आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात १८ ते २७ पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत २६ ते ३५ पैसे वाढ झाली होती. 

मुंबईत आता पेट्रोल प्रती लिटर ९८.१२ रुपयांना मिळत आहे. तर डिझेलचा दर ९० रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत २७ पैशांची वाढ झाली असून ते ९२ रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलच्या किंमतीत ३० पैशांनी वाढ होऊन ते ८२.३६ रुपयांवर पोहोचले आहे.

पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर तेल कंपन्यांनी इंधनांच्या दरात वाढ करण्यास सुरूवात केली. आठवडाभरात पेट्रोल १ रुपया १४ पैसे, तर डिझेल १ रुपया ३३ पैशांनी महाग झाले आहे.

या वर्षात आतापर्यंत ३१ वेळा इंधनांच्या किमतीत वाढ झाली आहे आणि ४ वेळा किंमती खाली आल्या आहेत. यावर्षी, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा वाढल्या आहेत. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत. 



हेही वाचा

कोविन पोर्टलमध्ये करण्यात आले हे नवीन बदल, जाणून घ्या प्रक्रिया

ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा