Advertisement

ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

म्युकोरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसचा पहिला रुग्ण ठाणे जिल्ह्यात आढळला आहे.

ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण
SHARES

म्युकोरमायकोसिस (mucormycosis)चा पहिला रुग्ण ठाणे जिल्ह्यात आढळला आहे. एका महिलेमध्ये ही लक्षणं आढळून आली असून तिचा डोळा निकामी झाला आहे.

महिलेला कोरोना झाला होता. त्या महिलेच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यात महिलेचे डोळे वर आललेले दिसून आले. तर उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचं तपासणी दरम्यान लक्षात आलं.

तपासणी दरम्यान आढळलं की, महिलेच्या उजव्या डोळ्यावर प्रकाश टाकल्यानंतरही डोळ्याची कोणतीच हालचाल होत नव्हती. तर महिलेच्या सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन चाचणी अहवालात देखील अनेक लक्षणं आढळून आली. उजव्या डोळ्याच्या मासपेशींना सूज आली होती.

तसंच इतरही अंतर्गत लक्षणं वैद्यकीय चाचणी अहवालात दिसून आली. म्युकोरमायकोसिस या आजाराची सांगितली गेलेली लक्षणं या महिलेत आढळल्यानं या महिलेला म्युकोरमायकोसिस असल्याचं जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

म्युकोरमायकोसिस म्हणजेच ‘ब्लॅक फंगस’ यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत आहे. यात रुग्णांचे डोळे निकामी होत असल्याचं काही प्रकार समोर आले आहेत. म्युकोरमायकोसिस नावाचा बुरशीपासून होणारा दुर्मीळ, पण अत्यंत घातक संसर्ग आहे. त्यातून डोळा गमविल्याची प्रकरणे मात्र नवीनच आहेत.

हा आजार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, कोरोनाकाळात कमी झालेली रोग प्रतिकार शक्ती. तर या आजाराचे सायनसमधून संक्रमण सुरू होते पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. ज्यामुळे पापणीला सूज येते, पापणी जड होते, डोळे पुढे येतात, डोळ्यांभोवतीची त्वचा काळपट होते, डोळ्यांची हालचाल मंदावते, धुरकट दिसू लागते, नाकावर सूज, नाक चोंदते, चेहऱ्यावर एका बाजूने सूज येते, डोळ्यांमध्ये वेदना होतात.

म्युकोरमायकोसिस हा काळ्या बुरशी सारखा असतो. तो केवळ डोळ्यांमध्ये नाही तर, मेंदू, हिरड्यांमध्ये तसंच छातीत देखील होऊ शकतो. यामुळे डोळा कायमचा निकामी होतो. शिवाय पॅरालिसिस आणि मृत्यूही यात ओढावण्याची शक्यता आहे, असं तज्ञांचं म्हणणं आहे.



हेही वाचा

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार, राजेश टोपेंची घोषणा

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे काढावे लागले डोळे, जाणून घ्या काय आहे 'ब्लॅक फंगस'

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा