Advertisement

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार, राजेश टोपेंची घोषणा

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील.

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार, राजेश टोपेंची घोषणा
SHARES

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक कोरोना (coronavirus) रुग्ण म्युकरमायकोसीस (Mucormycosis) या बुरशीजन्य आजारानं ग्रस्त आहे. याचे वाढते रुग्ण पाहता राज्य सरकारनं (Maharashtra Government)  जनजागृतीसाठी मोहिम हाती घेतली आहे. म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh tope) यांनी दिली.

जालना इथं माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात माहिती देतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि ज्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे.

नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरी परिणाम होत असल्याचं निदर्शनास येत आहे. या आजाराचे लवकर निदान होणं गरजेचं असल्यानं त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

या आजावरील औषध महागडं असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या १००० रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शन दखील चढ्या दरानं विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे लवकरच त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.

या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रीत ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार करून घेण्याचं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.हेही वाचा

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे काढावे लागले डोळे, जाणून घ्या काय आहे 'ब्लॅक फंगस'

तिसऱ्या संभाव्य लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा