मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. रुग्णवाढ घटल्याने रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. महिन्याभरापूर्वी मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३५ दिवस होता. आता रुग्ण दुपटीचा कालावधी १५३ दिवसांवर गेला आहे.
मुंबईत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची वेगाने वाढ होत होती. यावेळी रुग्ण दुपटीचा कालावधी ३५ दिवसांचा होता. त्यावेळी रोज १० हजार रुग्ण आढळत होते. त्यानंतर रुग्णसंख्या घटण्यास सुरूवात झाली. त्यामुळे रुग्ण दुपटीच्या कालावधीत चौपटीहून अधिक वाढ झाली आहे.
रविवारी मुंबईत २४०३ कोरोनाचे रुग्ण आढळले. तर ३३७५ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१ टक्के झालं आहे. मुंबईत ५१ हजार १६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
विभागवार रुग्ण दुपटीचा कालावधी
दहिसर – ८९ दिवस
अंधेरी पूर्व – १२० दिवस
मालाड –१२१ दिवस
कुलाबा – १२१ दिवस
अंधेरी पश्चिम – १३४ दिवस
भायखळा -१३५ दिवस
गोरेगाव – १३५ दिवस
एल्फिन्स्टन – १३९ दिवस
खार – १४३ दिवस
वांद्रे – १४३ दिवस
कुर्ला – १५४ दिवस
ग्रॅण्ट रोड – १५५ दिवस
चेंबूर – १५९ दिवस
सॅण्डहर्स्ट रोड – १७२ दिवस
भांडुप – १८० दिवस
मुलुंड – २०५ दिवस
घाटकोपर – २१५ दिवस
परळ – २१७ दिवस
चेंबूर पश्चिम –२२० दिवस
मरिन लाईन्स – २७७ दिवस
हेही वाचा -
आठवड्याभरात 'इतक्या' पोलीसांना कोरोनाची लागण