Advertisement

कोरोना प्रतिबंधक लसीचं 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करा- काँग्रेस

सुरूवातीला केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही सर्वांना मोफत लस देणार. नंतर मात्र त्यांनी आपली जबाबदारी झटकली. केंद्र सरकारने लसीकरणाबाबत राष्ट्रीय धोरण जाहीर करून स्पष्टता लोकांसमोर आणावी, अशी मागणी नाना पटोलेंनी केली.

कोरोना प्रतिबंधक लसीचं 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करा- काँग्रेस
SHARES

सुरूवातीला केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही सर्वांना मोफत लस देणार. नंतर मात्र त्यांनी आपली जबाबदारी झटकली. केंद्र सरकारने लसीकरणाबाबत राष्ट्रीय धोरण जाहीर करून स्पष्टता लोकांसमोर आणावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस (congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.

यावेळी नाना पटोले म्हणाले, सुरूवातीला केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही देशातील नागरिकांना मोफत लस देऊ. नंतर मात्र सोस्कीररित्या त्यांनी आपली जबाबदारी झटकल्याने ही जबाबदारी राज्यांना उचलावी लागत आहे. मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून केंद्र-राज्य विभाजनाचं पाप केलं. सध्याच्या घडीला १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य सरकार लसीकरण करत असून ४५ वर्षांपुढील लोकांचं लसीकरण केंद्रामार्फत होत आहे.

प्रत्यक्षात मात्र लसींचा पुरवठाच होत नसल्याने सर्वच वयोगटातील लोकांचं लसीकरण रखडलेलं आहे. त्यामुळे राज्यांमध्ये कुठलाही भेदभाव न करता केंद्राने सर्वांना लस उपलब्ध करुन द्यावी. शिवाय लस कुठून आणणार, कधीपर्यंत देणार याबाबतीत स्पष्टता आणावी, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला.

हेही वाचा- “मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच जगात भारताची नाचक्की”

केंद्र सरकारने १७% लोकांचं लसीकरण केल्याचं जाहीर केलं. पण लसीचे २ डोस किती लोकांना मिळाले? कोवॅक्सिन आणि सीरमने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तेवढी लस भारताला दिलीच नाही. मग या एवढ्या लसी आल्या कुठून? मोदी सरकारने चूक मान्य करुन खोटारडेपणा बंद करावा, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने टास्कफोर्स स्थापन करून मोदींच्या अपयशावर शिक्कामोर्तब केलं. मात्र, 'सर्वोच्च न्यायालय तज्ज्ञ नाही. त्यांनी कोविडच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करु नये' ही मोदी सरकारची भूमिका संविधानिक व्यवस्थेलाच न मानणारी आहे. कोलगेट किंवा २जी प्रकरणात आम्ही अशाप्रकारची वक्तव्य केली नाही. कारण न्यायालयांना आम्ही लोकशाहीचा आत्मा मानतो. 

भाजपचे लोक गांधी परिवारावर टीका करून अजून किती दिवस राज्य करणार? एम्स असो रुग्णालये असो तसंच सगळ्या व्यवस्था असो, देशाला उभं करण्याचं काम काँग्रेसने केलं. भाजपप्रमाणे लसीकरण बाजूला सारून सेंट्रल विस्टावर २० हजार कोटी खर्च करण्याचं पाप आम्ही केलं नाही. त्यामुळे आपली चूक मान्य करुन केंद्र सरकारने लसीकरणासाठी राष्ट्रीय धोरण ठरवावं आणि त्याबद्दलची स्पष्टता लोकांसमोर आणावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

(need national policy on covid 19 vaccination demands maharashtra congress president nana patole)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा