पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी अवघे ४३ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मंगळवारी (२५ आॅगस्ट) मोठी घट पाहायला मिळाली आहे. मंगळवारी पनवेल महापालिका हद्दीत फक्त ४३ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर तब्बल १७६ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. येथील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्क्यांच्या वर पोहचलं आहे.  

मंगळवारी आठ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पनवेेलमधील २, तळोजा येथील २, तसेच नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे आणि खारघर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील ४, कामोठ्यातील ४, खांदा कॉलनीतील ३, खारघरमधील १९, पनवेलमधील ८,  नवीन पनवेलमधील ५, तळोजा येथील ५ रुग्णाचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १०,५८१ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ९२८३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २६६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १०३२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा -

विलगीकरण केंद्रातला आनंदोत्सव करतोय मनावरील ताण हलका!

१६ रुग्णालयांवर केडीएमसीची कारवाई, कोरोना रुग्णांकडून अधिक बिल आकारलं 

लाॅकडाऊन पूर्णपणे काढून टाका! मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर


पुढील बातमी
इतर बातम्या