दिवाळीच्या फटाक्यांचा पक्षी-प्राण्यांना फटका

दिवाळीनिमित्त मुंबईसह राज्यभरातील नागरिक मोठ्या प्रमाणात फटाके फोडतात. फटाके फोडल्यानंतर होणाऱ्या धुरामुळं प्रदुषण होतं. परंतु, दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाच्या फोडण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं प्रदुषणातही घट झाली. मात्र. यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज सुसह्य पातळीवर असला तरीही यंदा सुमारे ४९ प्राणी-पक्ष्यांना दिवाळीतील जल्लोषाचा फटका बसला आहे.

फटाक्यांचा आवाज, धूर आणि भाजल्यानं जखमी होणाऱ्या पक्ष्यांबाबत मुंबईकर जागरूक होत असून गेल्या ३ वर्षांच्या तुलनेत यात निम्म्यानं घट झाल्याचं बाई साखराबाई दिनशॉ पेटिट रुग्णालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. दरवर्षी दिवाळीच्या दिवसांमध्ये रस्त्यावरील अनेक प्राणी किंवा पक्षी जखमी होतात.

रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, मागील ३ वर्षांमध्ये जनजागृतीमुळं हे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत आहे. या वर्षी तर यामध्ये गतवर्षांच्या तुलनेत निम्म्यानं घट झाली आहे. २०१७ साली शहरात पक्षी आणि प्राणी असं एकूण १०३ जखमी झाल्याची नोंद आहे. यामध्ये जवळपास निम्म्यानं घट होत २०१९ साली ४९ जखमींची नोंद झाली आहे. जखमींमध्ये कबुतरांची संख्या सर्वाधिक असून त्या खालोखाल भटकी कुत्रे आणि मांजरांचे प्रमाण अधिक आहे.

फटाक्यांमधून बाहेर पडलेल्या धुरामुळे प्राणी आणि पक्ष्यांना श्वसनाचा त्रास होतो. कुत्रा आणि मांजर यांसारख्या प्राण्यांवर फटाक्यांच्या आवाजामुळं मानसिक परिणाम होत असतात. ते आवाजानं घाबरतात. घाबरलेल्या अवस्थेत खाद्य घेतल्यास त्यांना उलटी होऊ शकते.


हेही वाचा -

ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते- संजय राऊत

शिवसेनेला पाठिंबा देण्यास सुशीलकुमार शिंदेंचा विरोध


पुढील बातमी
इतर बातम्या