शिवसेनेला पाठिंबा देण्यास सुशीलकुमार शिंदेंचा विरोध

शिवसेनेने सरकार स्थापन करण्यास पुढाकार घेतला आणि पाठिंब्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव दिला तर त्यावर आम्ही नक्कीच विचार करू, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी म्हटलं होतं.

शिवसेनेला पाठिंबा देण्यास सुशीलकुमार शिंदेंचा विरोध
SHARES

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले आहेत. मात्र, शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसचे  ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विरोध केला आहे. काँग्रेसनं शिवसेनेसोबत जाऊ नये, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. 

 ५० -५० फाॅर्म्युलावरून शिवसेना आणि भाजपातील वाद चांगलाच चिघळला आहे. त्यामुळे भाजपाला सरकार स्थापनेत अपयश आलं तर संख्याबळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी असेल. शिवसेनेने सरकार स्थापन करण्यास पुढाकार घेतला आणि पाठिंब्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव दिला तर त्यावर आम्ही नक्कीच विचार करू, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी म्हटलं होतं. हा प्रस्ताव सोनिया गांधी यांच्याकडं मांडून त्यावर अंतीम निर्णय घेऊ, असंही चव्हाण यांनी सांगितलं होतं. 

सुशीलकुमार शिंदे यांनी याला विरोध केला. काँग्रेस आणि शिवसेना वेगवेगळ्या विचारधारेचे आहेत. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये. राज्यातील जनतेनं दिलेला कौल मान्य करून विरोधी पक्षात बसावं, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की,  शिवसेनेसोबत सरकार स्थापण्याचा प्रश्नच येत नाही.  काँग्रेस विरोधी बाकावरच बसणार आहे.  भाजपाहेही वाचा -

शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदात वाटा मागितल्यामुळेच तिढा - मुनगंटीवार

ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते- संजय राऊत
संबंधित विषय