Advertisement

शिवसेनेला पाठिंबा देण्याचे काँग्रेसचे स्पष्ट संकेत

भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष चांगलाच उफाळला आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेला पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले आहेत.

शिवसेनेला पाठिंबा देण्याचे काँग्रेसचे स्पष्ट संकेत
SHARES

भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष चांगलाच उफाळला आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेला पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले आहेत. शिवसेनेकडून पाठिंब्याबाबत प्रस्ताव आल्यास तो आम्ही पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे घेऊन जाऊ, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.  

भाजपला महाराष्ट्रातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेला ही खुली आॅफर दिली आहे. ५० -५० फाॅर्म्युलावरून शिवसेना आणि भाजपातील वाद चांगलाच चिघळला आहे. त्यामुळे भाजपाला सरकार स्थापनेत अपयश आलं तर संख्याबळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी असेल. शिवसेनेने सरकार स्थापन करण्यास पुढाकार घेतला आणि पाठिंब्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव दिला तर त्यावर आम्ही नक्कीच विचार करू, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. हा प्रस्ताव सोनिया गांधी यांच्याकडं मांडून त्यावर अंतीम निर्णय घेऊ, असंही चव्हाण यांनी सांगितलं आहे. 

शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची गुरूवारी शिवसेना भवनात बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. शिवसेनेला आदित्य ठाकरे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद हवं असून त्यासाठी पडद्यामागून मोठ्या हालचाली सुरू असल्याचे संकेतही मिळत आहेत.



हेही वाचा -

जनता रॉक, भाजपा-शिवसेना शॉक

मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ वक्तव्य करायला नको होतं - उद्धव ठाकरे




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा