Advertisement

मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ वक्तव्य करायला नको होतं - उद्धव ठाकरे

शिवसेना आणि भाजपात बिघडलेल्या संबंधांना उद्धव यांनी फडणवीस यांना जबाबदार धरलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ वक्तव्य करायला नको होतं - उद्धव ठाकरे
SHARES

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५० फॉर्म्युला नाकारण्याचं ते वक्तव्य करायला नको होतं. त्या वक्तव्यामुळेच चर्चा फिस्कटली, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना आणि भाजपात बिघडलेल्या संबंधांना उद्धव यांनी फडणवीस यांना जबाबदार धरलं आहे. तर कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घालून आल्याचे समजू नये, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे. 

गुरूवारी शिवसेना भवन येथे झालेल्या नवनिर्वाचीत आमदार आणि शिवसेना नेत्यांच्या बैठकीत विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मित्रपक्षाला मित्रपक्षच मानतो, शत्रूपक्ष मानत नाही,  माझं अमित शाह यांच्यासोबत जे काही ठरलं आहे ते करावं. आम्ही स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू. 

भाऊबिजेच्या दिवशी वर्षा निवासस्थानावर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपात ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही, असं म्हटलं होतं. तसंच पुढील ५ वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. त्यामुळे उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करायला नको होतं असं म्हटलं आहे. 



हेही वाचा -

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी

राष्ट्रवादीचा 'हा' आमदार राज ठाकरेंच्या भेटीला




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा