Advertisement

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी

शिवसेना भवन येथे झालेल्या नवनिर्वाचीत आमदार आणि शिवसेना नेत्यांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी एकमताने निवड करण्यात आली.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी
SHARES

शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतपदी जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. गुरूवारी शिवसेना भवन येथे झालेल्या नवनिर्वाचीत आमदार आणि शिवसेना नेत्यांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी एकमताने निवड करण्यात आली. आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. 


तर आमदार सुनील प्रभू यांची विधानसभेतील शिवसेनेच्या पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली. या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार राज्यपालांची भेट घेणार आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे मानले जात होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार असल्याची आधी चर्चा होती. मात्र, बुधवारपासून एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. 

आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई , दिवाकर रावते, रामदास कदम,  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आणि सहयोगी आमदार दुपारी ३.३० वाजता राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या विधीमंडळ नेत्यांची नावं निश्चित करण्यात आली. भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. हेही वाचा -

राष्ट्रवादीचा 'हा' आमदार राज ठाकरेंच्या भेटीला

विनाशकाले विपरीत बुद्धी ही अवस्था भाजपाचीच - संजय राऊत
संबंधित विषय
Advertisement