Advertisement

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी 'ह्या' नेत्याची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसची बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी 'ह्या' नेत्याची निवड
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी जेष्ठ नेते अजित पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला. निवडीनंतर अजित पवार यांनी सर्व आमदारांचे आभार मानले. 

राष्ट्रवादी काँग्रेसची बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जयंत पाटील यांनी विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्व नेत्यांसहीत आमदारांनी अनुमोदन दिले. यावेळी जयंत पाटील म्हणाले ,मोदी आणि शाह यांनी ३७० कलमाचा मुद्दा मांडला. मात्र, आम्ही जनतेचे मुद्दे मांडले. सर्वात कमी जागा लढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांमुळे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला. शिवरायांच्या तत्वाचं पालन शरद पवार यांनी केलं. पक्षाला नवी ऊर्जा देण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे.  जयंत पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्यांवर टीका केली. पक्ष बदलून नाही तर मनं बदलून लोकांची मतं जिंकायची असतात. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर जनतेला मान्य नाही हे त्यांनी दाखवून दिल्याचंही ते म्हणाले. 

अजित पवार यावेळी म्हणाले की, तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी आणि पराभूत उमेदवारांशी निवडणूक निकालावर चर्चा करू. तसंच बेरोजगारी, शेती प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडू.  पहिल्यांदा सरकार स्थापन करणाऱ्यांना दिवाळी गोड खाता आली नाही अशा शब्दात त्यांनी शिवसेना, भाजपावर टीका केली. आम्ही निवडणुकीतील कामावर खूश आहोत. मात्र, सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारे आनंदी नाहीत, असंही ते म्हणाले. 



हेही वाचा -

भाजपाने शिवसेनेला दिला 'हा' प्रस्ताव

भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा