Advertisement

भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस

भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस
SHARES

भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. बुधवारी विधीमंडळात भाजपाच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक झाली. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते चंद्रकात पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भाजपाचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्र सिंह तोमर, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे, गणेश नाईक, संजय कुटे, देवयानी फरांदे, देवराव भोईर, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले आदींनी अनुमोदन दिले. 

विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आल्यामुळे फडणवीस हेच भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचं निश्चीत झालं आहे.  बैठकीला सर्व नवनिर्वाचीत आमदार फगवे फेटे बांधून आले होते. निवड झाल्यानंतर फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाच्या सर्व आमदारांचे आभार मानले. राज्यात महायुतीचंच सरकार असेल आणि ते पुढील पाच वर्ष स्थिर राहील, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे. 

अफवांवर विश्वास ठेऊ नका. १९९५ पासून कुठल्याही पक्षाला ७५ पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नाहीत. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. हा महायुतीला मिळालेला कौल आहे, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

प्रस्ताव मांडताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी सक्षमपणे कारभार सांभाळला. पाच वर्षात त्यांनी अनेक प्रश्न खुबीनं सोडवले. त्यामुळे त्यांच्याशिवाय कोणाचेही नाव पुढे येऊ शकत नाही.



हेही वाचा -

महायुती, आघाडीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची आज निवड




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा