Advertisement

महायुती, आघाडीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची आज निवड

भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होत असून दोन्ही पक्ष आपल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करणार आहेत.

महायुती, आघाडीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची आज निवड
SHARES

भाजपा आणि शिवसेनेत सत्ता संघर्ष चांगलाच रंगला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजपाची बैठक होत आहे. तर बैठकीत भाजपा आपला विधीमंडळ पक्षाचा नेता निवडणार आहे. याशिवाय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होत असून दोन्ही पक्ष आपल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करणार आहेत. 

भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची, तर शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड होईल असं बोललं जात आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या नावांची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे पाटील हे मनसेचे नेते असतील. तर समाजवादी पक्षाच्या नेतेपदी अबु आसिम आझमी, बविआचे हितेंद्र ठाकूर हे नेतेपदी असतील. तर एमआयएमच्या नेतेपदी डॉ. फारुख शाह किंवा मौलाना मुफ्ती इस्माईल यांची निवड होण्याची शक्यता आहे.



  हेही वाचा -




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा