भाजपा-शिवसेनेची बैठक उद्धव ठाकरेंनी केली रद्द

भाजपा आणि शिवसेनेमध्ये संध्याकाळी ४ वाजता बैठक होणार होती. ही बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रद्द केली, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

SHARE

शिवसेनेला ५०-५० च्या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असं, आश्वासन भाजपाने कधीही दिलेलं नव्हतं. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपाने आयोजित केलेली बैठक शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रद्द केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही बैठक रद्द केली असल्याची माहिती दिली. 

भाजपा आणि शिवसेनेमध्ये संध्याकाळी ४ वाजता बैठक होणार होती. मात्र , फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नाही असं मुख्यमंत्रीच स्वतःच म्हणत असतील तर  या बैठकीत कशावर चर्चा करायची. त्यामुळे ही बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रद्द केली, असं संजय राऊत यांनी सांगितलं. 

राऊत म्हणाले,  जर फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नव्हती असं मुख्यमंत्री म्हणत असतील तर  आपण सत्याची व्याख्याच बदलायला हवी. कारण, मुख्यमंत्री ज्याबाबत बोलत आहेत त्यावर भाजपा आणि शिवसेनेमध्ये काय चर्चा झाली हे सर्वांना माहिती आहे, माध्यमांचे प्रतिनिधीही त्या ठिकाणी उपस्थित होते.हेही वाचा -

मुख्यमंत्र्यांनी फणा काढण्याची गरज नाही - शिवसेना

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलंच नव्हतं - देवेंद्र फडणवीस
संबंधित विषय
ताज्या बातम्या