Advertisement

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलंच नव्हतं - देवेंद्र फडणवीस

मुंबईत वर्षा या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलंच नव्हतं - देवेंद्र फडणवीस
SHARES

शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन कधीच दिलं नव्हतं, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता खळबळ उडवून दिली आहे. मुंबईत वर्षा या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेना आणि भाजपात ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही. पुढील पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असं फडणवीस यांनी स्पष्ठ केलं. आहे. दिवाळी फराळानिमित्त पत्रकारांनी वर्षा निवास्थानी बोलावण्यात आलं होतं. यावेळी अनौपचारिक गप्पा मारताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने शिवसेना आणि भाजपात मोठी दरी निर्माण होण्याची शक्यता आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळण्याची मागणी शिवसेनेने उघडपणे केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशी उद्धव ठाकरेंनी मी भाजपाच्या सगळ्या अडचणी समजून घेणार नाही असं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं.

तर शनिवारी मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत ५०-५० च्या फॉर्म्युल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं आणि याबाबत लेखी घ्यायचं असा ठराव झाला. मातोश्रीबाहेर आणि वरळीत आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही झळकले आहेत.  या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाकारण्याच्या वक्तव्याचे पडसाद शिवसेनेत उमटणार आहेत. शिवसेना यावर काय भूमिका घेते याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. हेही वाचा -

मलाही न्याय मिळेल : एकनाथ खडसे

सत्तास्थापनेचा रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरेंच्या हाती- संजय राऊत
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा