Advertisement

ही शर्यत रे… सत्तास्थापनेची, रावते, मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी सोमवारी सकाळी राजभवनात येऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राज्यपालांना भेटल्याने महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडींनी वेग घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

ही शर्यत रे… सत्तास्थापनेची, रावते, मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट
SHARES

शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी सोमवारी सकाळी राजभवनात येऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राज्यपालांना भेटल्याने महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडींनी वेग घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी एकत्र न येता वेगवेगळ्या वेळेत भेटी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिवाकर रावते म्हणाले, 'मी मुंबईचा महापौर असल्यापासून म्हणजे १९९३ पासून दरवर्षी पाडव्याच्या दिवशी राज्यपालांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देत असतो. यानुसार मी त्यांना भेटायला आलो होतो.'

तर, राज्यपालांची घेतलेली भेट ही राजकीय कारणांसाठी नसून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी होती, असं फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीस पुन्हा एकदा सरकारस्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार आहेत.



हेही वाचा-

मुख्यमंत्रीपदाचं लेखी आश्वासन द्या, शिवसेना आमदार भाजपविरोधात आक्रमक

राज्यात स्पष्ट बहुमतासह पुन्हा महायुतीच



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा