Advertisement

मलाही न्याय मिळेल : एकनाथ खडसे

भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मलाही न्याय मिळेल : एकनाथ खडसे
SHARES

भाजपमध्ये बाहेरून आलेल्या दत्तक व सावत्र पुत्रांना न्याय मिळतो. मी तर  पक्षातच जन्माला आलोय, त्यामुळे मला नक्कीच न्याय मिळेल, अशी अपेक्षा भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. 

भाजपातून अडगळीत टाकण्यात आलेल्या एकनाथ खडसे यांना विधानसभा निवडणुकीत तिकिटही नाकारण्यात आलं. मुक्ताईनगरमधून त्यांची कन्या रोहिणी यांनी उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांंचा पराभव झाला. ३० वर्षांपासून मतदारसंघ ताब्यात ठेवणाऱ्या खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. पक्षाला मी कल्पना दिली होती. मात्र, माझं पक्षाने एेकलं नाही, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

खडसे म्हणाले की,  १९८० पासून पक्षाच्या स्थापनेपासून मी काम करत आहे. भाजपामध्येच मी लहानाचा मोठा झालो. बाहेरून आलेल्या दत्तक पुत्रांना न्याय मिळतो. त्यामुळे पक्ष मला दूर लोटणार नाही. नक्कीच न्याय देईल. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच तसं स्पष्ट केलं आहे, असंही खडसे यांनी म्हटलं. हेही वाचा -

सत्तास्थापनेचा रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरेंच्या हाती- संजय राऊत

ही शर्यत रे… सत्तास्थापनेची, रावते, मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा