Advertisement

सत्तास्थापनेचा रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरेंच्या हाती- संजय राऊत

महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरणार असून हा ब्रश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाती असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

सत्तास्थापनेचा रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरेंच्या हाती- संजय राऊत
SHARES

महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरणार असून हा ब्रश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाती असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेने अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यास सुरूवात केली असून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याने राऊत यांनी सत्तास्थापनेचा रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरे यांच्या हाती असल्याचं एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. 

 'प्रहार जनशक्ती'चे अचलपूरमधील आमदार बच्चू कडू, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी शनिवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी या पाठिंब्यासाठी मध्यस्थी केली. विदर्भातील रामटेकचे आशिष जयस्वाल आणि भंडाराचे नरेंद्र गोंडेकर या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनीही शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचं संख्याबळ ५६वरून ६० वर गेलं आहे. 

सोबतच जळगावच्या मुक्ताईनगरमधून निवडून आलेले चंद्रकांत पाटील आणि इचलकरंजीतील प्रकाश आवाडे हे शिवसेनेचे २ बंडखोर आमदारही पुन्हा एकदा पक्षप्रवेश करण्याची शक्यता असल्याने सेनेचं संख्याबळ ६२पर्यंत पोहोचू शकतं. 

तर दुसऱ्या बाजूला भाजपनेही संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले असून २० अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. यामुळे भाजपचं संख्याबळ १०५ वरून ११८ ते १२०च्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

ही शर्यत रे… सत्तास्थापनेची, रावते, मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुख्यमंत्रीपदाचं लेखी आश्वासन द्या, शिवसेना आमदार भाजपविरोधात आक्रमक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा