पावसात भिजण्याचा अनुभव कमी पडला, मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांंचं सातारा येथे भर पावसातील भाषण चांगलंच गाजलं. याच भाषणावरून फडणवीस यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.

SHARE

निवडणूक प्रचारात पावसात भिजावं लागतं, त्यामध्ये आमचा अनुभव थोडा कमी पडला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. वर्षा निवासस्थानी दिवाळी फराळानिमित्त पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी पवार यांच्या टीका केली. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांंचं सातारा येथे भर पावसातील भाषण चांगलंच गाजलं. त्यांच्या भाषणाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळाने पाऊस सुरू झाला. मात्र, त्यांनी भाषण न थांबवता ते चालूच ठेवलं. पावसातील त्यांच्या या भाषणाने वातावरण बदलून गेलं. या भाषणाचा परिमाण दिसून आला. लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. याच भाषणावरून फडणवीस यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. 

पत्रकारांसाठी वर्षा निवासस्थानी दिवाळी फराळ पार्टी आयोजीत केली होती. यावेळी अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीस यांनी, पावसात भिजण्याचा आमचा अनुभव कमी पडला असं म्हणत पवार यांच्यावर टीका केली. हेही वाचा -

मुख्यमंत्र्यांनी फणा काढण्याची गरज नाही - शिवसेना

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलंच नव्हतं - देवेंद्र फडणवीस
संबंधित विषय
ताज्या बातम्या