Advertisement

विनाशकाले विपरीत बुद्धी ही अवस्था भाजपाचीच - संजय राऊत

विनाशकाले विपरीत बुद्धी ही आमची नाही भाजपाची अवस्था आहे. दिलेला शब्द पाळायचा ही आम्हाला बाळासाहेबांकडून शिकवण मिळाली आहे, अशा शब्दात राऊत यांनी पलटवार केला आहे.

विनाशकाले विपरीत बुद्धी ही अवस्था भाजपाचीच - संजय राऊत
SHARES

शिवसेनेने इतर पर्यायांचा विचार केला तर ती विनाशकाले विपरीत बुद्धी ठरेल असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी ही आमची नाही भाजपाची अवस्था आहे. दिलेला शब्द पाळायचा ही आम्हाला बाळासाहेबांकडून शिकवण मिळाली आहे, अशा शब्दात राऊत यांनी पलटवार केला आहे. 

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचं समसमान वाटप व्हावं. तसंच भाजपाने दिलेला शब्द पाळावा आणि  युतीधर्माचं पालन करावं, हीच शिवसेनेची भूमिका आहे. आम्ही नरमाईची  भूमिका घेतलेली नाही. युती असल्याने चर्चा होऊ शकते असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र  फडणवीस यांनी समसमान फॉर्म्युला असेल असं म्हटलं होतं. आमचीही ती एकच मागणी आहे. शिवसेना आमच्यासोबत येणार नसेल तर आम्हाला पर्याय खुले आहेत असं जर भाजपा म्हणू शकते तर तो हक्क आम्हालाही आहे.  मात्र, उद्धव ठाकरे हे पाप करणार नाहीत तसं त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे, असंही यावेळी राऊत म्हणाले. 



हेही वाचा -

सुधीर मुनगंटीवर यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा