Advertisement

राष्ट्रवादीचा 'हा' आमदार राज ठाकरेंच्या भेटीला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.

राष्ट्रवादीचा 'हा' आमदार राज ठाकरेंच्या भेटीला
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. राष्ट्रवादीचे जुन्नरमधून निवडून आलेले आमदार अतुल बेनके यांनी गुरूवारी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. 

राज्यात भाजपा आणि शिवसेनेत सत्तासंघर्ष रंगला असताना दुसरीकडे मनसे आणि राष्ट्रवादीची मैत्री भक्कम होत असल्याचं दिसून येत आहे.  पवारांच्या कार्यपद्धतीने आपण प्रभावित झालो असून त्यांची भेट घेण्याची इच्छा संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर बुधवारी त्यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यापाठोपाठ गुरूवारी अतुल बेनके राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कृष्णकुंजवर गेले. 

जुन्नर मतदारसंघातून अतुल बेनके हे शिवसेनेचे शरद सोनावणे यांचा पराभव करून निवडून आले. या मतदारसंघातून २०१४ साली मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे निवडून आले होते. मात्र, सोनावणे यांनी यंदाची विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर लढवली. मात्र, शिवसेनेच्या आशा बुचके यांनी केलेल्या बंडखोरीमुळे सोनावणे यांचा पराभव झाला. आशा बुचके यांनी अपक्ष निवडणूक लढवत ५० हजारपेक्षा जास्त मते घेतली. अतुल बेनके यांना ७४ हजार तर शरद सोनावणे यांना ६५ हजार मते मिळाली.



हेही वाचा -

विनाशकाले विपरीत बुद्धी ही अवस्था भाजपाचीच - संजय राऊत

सुधीर मुनगंटीवर यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा