'या' तीन आमदारांनी दिला भाजपाला पाठिंबा

भाजपाचे संख्याबळ ११९ वर गेले आहे. आतापर्यंत भाजपाला १४ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे.

SHARE

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने काँग्रेसची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिला आहे.  बविआच्या तीन आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने भाजपाचे संख्याबळ ११९ वर गेले आहे. आतापर्यंत भाजपाला १४ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. 

बविआने भाजपला पाठिंबा दिल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.  बविआकडे एकूण तीन आमदार आहेत. याशिवाय गुरूवारी इचकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचं पत्र दिलं. भाजपला आतापर्यंत शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील, चंद्रपूरचे किशोर जोगेवार, शाहूवाडीचे आमदार विनय कोरे, गोंदीयाचे आमदार विनोद अग्रवाल, उरणचे आमदार महेश बालदी, बडनेराचे रवी राणा, बार्शीचे राजेंद्र राऊत, मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन, गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे आणि लोहाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे.

शिवसेनेला साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित,  रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, प्रहार जनशक्तीचे मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांनी पाठिंबा दिला आहे.हेही वाचा -

शिवसेनेला पाठिंबा देण्याचे काँग्रेसचे स्पष्ट संकेत

जनता रॉक, भाजपा-शिवसेना शॉक
संबंधित विषय
ताज्या बातम्या