शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदात वाटा मागितल्यामुळेच तिढा - मुनगंटीवार

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठवडा झाला आहे. मात्र, अजून महायुतीतील सत्तावाटपाचा तिढा सुटलेला नाही. शिवसेनेने सत्तेचं समान वाटप आणि अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळण्याची मागणी केली आहे.

SHARE

शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्यामुळे तिढा निर्माण झाला, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. भाजपाने दिलेला शब्द पाळला असून दिवाळी असल्यामुळे सत्तास्थापनेच्या चर्चेला विलंब झाला आहे. भाजपा सत्तास्थापनेच्या चर्चेसाठी पुढाकार घेईल, असंही मुनगंटीवर यांनी म्हटलं आहे. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठवडा झाला आहे. मात्र, अजून महायुतीतील सत्तावाटपाचा तिढा सुटलेला नाही. शिवसेनेने सत्तेचं समान वाटप आणि अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळण्याची मागणी केली आहे. मुनंगटीवार यांनी महायुतीतील तिढ्याला शिवसेनेची ही मागणीच कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या काँग्रेसच्या वक्तव्यावरही त्यांनी टिका केली. काँग्रेस अशा परिस्थितीचा नेहमीच फायदा घेते. यापूर्वीही काँग्रेसचा अशा घटनांचा फायदा घेतला आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस हेदेखील स्वत:ला शिवसैनिकच समजतात. त्यामुळे मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच दिल्यासारखं आहे, असंही ते म्हणाले. येत्या आठवड्यात नवं सरकार सत्तेत येईल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.हेही वाचा -

ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते- संजय राऊत

व्हॉट्सअप हेरगिरी थांबवा, धनंजय मुंडे यांचं राज्यपालांना पत्र
संबंधित विषय
ताज्या बातम्या