Advertisement

व्हॉट्सअप हेरगिरी थांबवा, धनंजय मुंडे यांचं राज्यपालांना पत्र


व्हॉट्सअप हेरगिरी थांबवा, धनंजय मुंडे यांचं राज्यपालांना पत्र
SHARES

मोबाइलमधील व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून देशातील पत्रकार, मानवी हक्क चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसंच, सर्वसामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात सुरू असलेली हेरगिरी निषेधार्ह, संतापजनक आहे. ती बंद करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करून संबंधित प्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

वैयक्तिक माहिती

धनंजय मुंडे यांनी गुरुवारी यासंदर्भात पत्र लिहिलं असून, यामध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देशातील नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडून त्यातील फोटो, व्हिडीओ, ऑडीओ संवादासारखी वैयक्तिक स्वरूपाची सगळीच माहिती काढून घेत असल्याचं समोर आलं आहे.

माहितीची हेरगिरी

देशातील लोकसभा निवडणुकीच्या काळात २० एप्रिल ते १० मे या कालावधीत एका विशिष्ट संस्थेनं मोठ्या प्रमाणात माहितीची हेरगिरी केल्याचं व त्याबद्दल अमेरिकेतील एका न्यायालयात खटला दाखल झाल्याचं समजताचं मुंडे यांनी राज्यपालाचे लक्ष वेधले आहे.



हेही वाचा -

लोहपुरूषाला महाराष्ट्र पोलिसांकडून अनोखी मानवंदना

PMC Crisis: पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा