लोहपुरूषाला महाराष्ट्र पोलिसांकडून अनोखी मानवंदना

1935 पासूनचा इतिहास असलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या विविध जिल्ह्यातील बँण्ड पथकाने या कार्यक्रमात सहभागी होत अनोख्या पद्धतीने मानवंदना वाहिली.

लोहपुरूषाला महाराष्ट्र पोलिसांकडून अनोखी मानवंदना
SHARES
भारताचे लोह पुरूष अशी ओळख असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144 व्या जयंती निमित्ताने मुंबईच्या 'गेटवे ऑफ इंडिया' येथे महाराष्ट्र पोलिसदला तर्फे 'बँण्ड डिस्प्ले' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी विविध जिल्ह्याच्या पोलिस 'बँण्ड' पथकांनी त्यांच्या  अनोख्या पद्धतीने लोहपुरूषाला मानवंदना देत मंञमुग्ध केलं.

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पेटल यांच्या 144 व्या जयंतीचं औचित्य साधत मुंबईमध्ये 'गेटवे ऑफ इंडिया' वरही महाराष्ट्र पोलिस दलातर्फे  'बँण्ड डिस्प्ले' या कार्यक्रमाचे आयोजन केलं होते. 1935 पासूनचा इतिहास असलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या विविध जिल्ह्यातील बँण्ड पथकाने या कार्यक्रमात सहभागी होत अनोख्या पद्धतीने मानवंदना वाहिली. त्यावेळी 'गेट वे आँफ इंडिया'वर  भारताच्या तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैयस्वाल, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह पोलिस दलातील अन्य वरिष्ठ अधिकारी ही उपस्थित होते. या कार्यक्रमाला गेट वे आँफ इंडियाला भेट देण्यासाठी येणाऱ्या असंख्य पर्यटकांसह मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा