PMC Crisis: पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

केशुमल यांना कोणताही आजार नव्हता. माञ त्या पीएमसी बँक घोटाळा उघडकीस आल्यानंतर नैराक्षेत होत्या असे केशुमल यांच्या मुलीने सांगितले.

PMC Crisis: पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
SHARES
मुलुंडमध्ये पीएमसी आणखी एका खातेधारका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. केशुमल हिंदुजा (68) असं मृत खातेधारकाचे नाव आहे. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण ह्रदय विकारामुळे त्यांचा मृत्यू झाला. पीएमसी घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्या पैसे बँकेत अडकल्यामुळे नैराक्षेत होत्या.

 मुलुंड काँलनीत केशुमल हिंदुजा या त्याच्या कुटुंबियांसोबत रहात होत्या. केशुमल याचे किराणा मालाचे दुकान होते. दुकानात जमा होणारा नफा हा केशुमल या पीएमसी बँकेत जमा करायच्या. पीएमसी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांची सर्व जमा पूंजी बँकेत अडकली. त्यामुळे त्या मागील अनेक दिवसांपासून नैराक्षेत होत्या. 29 आँक्टोंबर रोजी केशुमल या झोपल्या असताना. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलवण्यात आले. माञ 31 आँक्टोंबरच्या मध्यराञी त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

केशुमल यांना कोणताही आजार नव्हता. माञ त्या पीएमसी बँक घोटाळा उघडकीस आल्यानंतर नैराक्षेत होत्या असे केशुमल यांच्या मुलीने सांगितले.  पीएमसी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतरची ही चौथी घटना आहे. या पूर्वी ही ओशिवराच्या संजय गुलाटी, मुलुंडचे फत्तोमल पंजाबी, यांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तर एका महिलेने हा घोटाळा उघडकीस आल्याच्या धक्याने  आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा