नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ४९ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (२८ डिसेंबर) कोरोनाचे नवीन ४९ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५० हजार ७९१ झाली आहे. 

सोमवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ७, नेरुळ ५, वाशी ६, तुर्भे ६, कोपरखैरणे १०, घणसोली २, ऐरोली १२ , दिघा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. तर १०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १७, नेरुळ ३०, वाशी ९, तुर्भे ७, कोपरखैरणे ६, घणसोली ६, ऐरोलीतील ७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८, ८२२ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०४६ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ९२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आता घटत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील सर्व विभागांत उभारलेली १२ काळजी केंद्र टप्प्याटप्प्याने बंद केली आहेत. वाशी येथील पालिका रुग्णालयही सामान्य केले असून आता वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात उपचार होणार आहेत. तर अत्यवस्थ रुग्णांसाठी डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून नवीन रुग्ण संख्या शंभरच्या आत आहे. त्यामुळे पालिकेने १३ कोरोना काळजी केंद्रापैकी ९ केंद्रे पालिकेने अगोदरच बंद केली होती. आता उरलेल्या चारपैकी तीन केंद्रांत नव्याने प्रवेश बंद केला असून एकाच ठिकाणी उपचार केले जात आहेत. 


हेही वाचा -

मुंबई लोकलमध्ये होणार 'कोरोना'बाबत जनजागृती

जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य; मनसेची पत्राद्वारे पश्चिम रेल्वेकडे मागणी


पुढील बातमी
इतर बातम्या