कल्याणमध्ये ६४ बेड्सचं कोव्हिड सेंटर सुरू

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्यावतीने कल्याणमधील वसंत व्हॅली याठिकाणी ५५ ऑक्सिजन बेड्स आणि ९ आयसीयू बेड्स अशा ६४ बेड्सचं कोव्हिड सेंटर उभारण्यात आलं आहे. या सेंटरचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राशेजारी आरक्षण असलेल्या नियोजित सुतिकागृहाच्या तीन मजली इमारतीमध्ये एप्रिलमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरु केले होते. आता त्या ठिकाणी सुविधायुक्त कोव्हिड उपचार केंद्र सुरू केलं आहे. 

वसंत व्हॅली विभागात उभारण्यात आलेल्या समर्पित कोव्हिड रुग्णालयाच्या माध्यमातून ५४ ऑक्सिजन बेड्स तसेच ९ आयसीयू बेड्सची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने उभारण्ययात आलेल्या या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गास निर्देश दिले व डॉक्टर आणि सपोर्टींग स्टाफचे कौतुक करत मनोबल वाढवले.

कल्याण परिसरातील कोविड १९ रुग्णांना या रुग्णालयाच्या उपलब्धतेमुळे ताबडतोब तसेच सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देणे शक्य होणार असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढण्यास निश्चितपणे यश मिळेल असे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले. वसंत व्हॅली येथील डेडिकेटेड कोव्हीड रूग्णालयात ५४ ऑक्सिजन बेड, ९ बेड आय सी यु, ५ व्हेंटिलेटर, आणि ४ बाय पंप मशीन अशा सुविधा आहेत. रूग्णालयात एक्सरे रुम, पॅथालॉजी रूम्, डायनिंग रुम ,डफिंग रुम, रूग्णासाठी वातानुकूलित यंत्रणा अशा सुविधा आहेत. 


हेही वाचा -

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं ‘या’ विषयावर पत्र

बलात्काराच्या गुन्ह्यात ‘या’ अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक


पुढील बातमी
इतर बातम्या