बलात्काराच्या गुन्ह्यात ‘या’ अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक

अर्जुनकुमारने तिला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यासोबत शारिरीक संबध ठेवले. याच दरम्यान तिला अर्जुनकुमारचे या पूर्वीच लग्न झाले असून तिला चार वर्षाचा मुलगा असल्याचे कळाले.

बलात्काराच्या गुन्ह्यात ‘या’ अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक
SHARES

चित्रपट क्षेत्रात काम मिळवण्यासाठी आलेल्या २२ वर्षीय मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शारिरीक संबध ठेवणाऱ्या अभिनेत्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. अर्जुनकुमार मुतनेजा (३३) असे या आरोपीचे नाव आहे. लग्न झालेले असतानाही, त्याने खोटं सांगून  मुलीची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- आलिशान गाड्यांमधून केली जायची ड्रग्ज तस्करी, आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा

मूळची परभणीची असलेली तरुणी चित्रपट क्षेत्रात काम करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मुंबईत आली होती. चित्रपटात काम मिळवण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतानाच, तिची ओळख अर्जुनकुमारशी झाली होती. दोघेही एकाच क्षेत्रात असल्याने दोघांमध्ये पुढे मैत्रिचे संबध प्रस्तापित झाले. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. याच दरम्यान लाँकडाऊन झाल्याने हाताला काम नसलेल्या पीडितेला उधारनिर्वाह करणे कठीण जात होते. त्यावेळी अर्जुनकुमार याने तिला स्वतःच्या घरी राहण्यास बोलावले. या दरम्यान अर्जुनकुमारने तिला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यासोबत शारिरीक संबध ठेवले. कालांतराने तिला अर्जुनकुमारचे या पूर्वीच लग्न झाले असून त्याला चार वर्षाचा मुलगा असल्याचे कळाले.

हेही वाचाः- आठवडाभर राज्यात मान्सून सक्रिय राहणार

त्यानंतर तिने अर्जुनकुमारच्या पत्नीला फोन करून खात्री करून घेतली. त्यावेळी अर्जुनकुमारला एक चार वर्षाची मुलगी असल्याचे कळाल्यानंतर तिच्या पायाखालची जमिनच सरकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून अर्जुनकुमारला शुक्रवारी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा