Advertisement

संजय दत्तनं 'शमशेरा' चित्रपटाचं चित्रिकरण केलं पूर्ण

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि संजय दत्तचा आजार पाहता सेटवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

संजय दत्तनं 'शमशेरा' चित्रपटाचं चित्रिकरण केलं पूर्ण
SHARES

अभिनेता संजय दत्तनं सोमवारी 'शमशेरा' या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. 'शमशेरा'च्या सेटवरुन संजयचा फोटो समोर आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग आणि संजय दत्तचा आजार पाहता सेटवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

चित्रपटात रणबीर कपूर याचीही महत्त्वाची भूमिका आहे. रणबीरचे चित्रीकरण यापूर्वीच पूर्ण झालें होते. तर संजयचे काही भागाचे चित्रीकरण व्हायचे होते. सोमवारी सेटवर पोहोचून संजयनं आपल्या भागाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.

संजूसाठी 'शमशेरा'च्या सेटवर विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी सेटवर फारच कमी लोक उपस्थित होते. हजर असलेल्या प्रत्येकाची कोरोना टेस्ट आधीच झाली आणि त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सर्वांनी अतिशय सावधगिरीनं शूट पूर्ण केलं. सोमवारी उशीरा रात्रीपर्यंत थांबून संजयनं दोन दिवसांचं चित्रीकरण एकाच दिवसात पूर्ण केलं.

८ ऑगस्ट रोजी संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्यांची पत्नी मान्यता आणि मुले दुबईमध्ये होती. ४ दिवसानंतर त्यांला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. परंतु ११ ऑगस्ट रोजी संजयला फुफ्फुसांच्या कर्करोगाचं निदान झालं.

त्यानंतर तो उपचारांसाठी परदेशात जाणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला. परंतु सध्या संजय दत्त मुंबईतच डॉ. जलील पारकर यांच्याकडे उपचार घेत आहे. संजयला अमेरिकेचा पाच वर्षांचा व्हिसा मिळाला आहे. लवकरच तो आपल्या उर्वरित चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण करून उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा