ओशिवरात विवाहबाह्य संबंधातूनच मुलाची हत्या

पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले असता गोळ्या झाडून तोंड लपवून इमारतीतून विकीचे वडिलच बाहेर पडत असल्याचे स्पष्ठ झाल्यानंतर पोलिसांनी श्रीनिवास यांना ताब्यात घेतले.

ओशिवरात विवाहबाह्य संबंधातूनच मुलाची हत्या
SHARES
सोमवारी ओशिवरा येथे एका तरूणाचा घरात गोळ्या झा़डून खून करण्यात आला होता. विवाहबाह्य संबंधामध्ये अडथळा ठरत असल्यामुळेच वडिलांनी मुलाची हत्या केल्याचे उघडकीस आलं आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी श्रीनिवास गंजी यांना अटक केली आहे. या प्रकरणी अंबोली पोलिस अधिक तपास करत आहेत.

दोन गोळ्या झाडल्या

ओशिवरा येथील हिरा पन्ना माॅलजवळील नर्मदा इमारतीत विकी हा फ्लॅट नं ३११ मध्ये रहायचा. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता विकीला भेटण्यासाठी एक अनोळखी व्यक्ती घरी आला होता. इमारतीत फारशी वर्दळ नव्हती आणि विकी यांच्या घरी कुणी नसल्याचा अंदाज घेऊन अचानक त्याने त्याच्याजवळील पिस्तुलातून विकीवर दोन गोळ्या झाडल्या आणि पळ काढला. या दोन्ही गोळ्या विकीच्या छातीत घुसल्या आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. 


उपचारादरम्यान मृत्यू

फायरिंगच्या आवाजाने  शेजारी घराबाहेर आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विकीच्या दिशेने त्यांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला देत, विकीला उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेले. मात्र विकीच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्ञाव झाल्यामुळे उपचारादरम्यान विकीचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषीत केले. 

सीसीटिव्हीची मदत

या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात ३०२भा.द.वि कलमांतर्गत  हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले असता गोळ्या झाडून तोंड लपवून इमारतीतून विकीचे वडीलच बाहेर पडत असल्याचे स्पष्ठ झाल्यानंतर पोलिसांनी श्रीनिवास यांना ताब्यात घेतले. श्रीनिवास यांच्या विवाहबाह्य संबधांना विकीचा नकार होता. यावरून घरात तणावाचे वातावरण होते. त्यामुळेच विकीची हत्या केल्याची कबूली श्रीनिवास यांनी दिली. श्रीनिवास यांनी हत्येत वापरलेले पिस्तुल कुठून आणले याचा तपास करत आहेत. 

 

हेही वाचा  -

पायल तडवी आत्महत्याप्रकरणी दोषारोपपत्र सादर

बनावट दागिने गहाण ठेवून बँकांची फसवणूक, ६ जणांना अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय