पायल तडवी आत्महत्याप्रकरणी दोषारोपपत्र सादर

मुंबईतील बहुचर्चित डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 1203 पानांचं दोषारोपपत्र तयार केलं असून मंगळवारी हे आरोपपत्र न्यायालयात सादर केलं आहे..

पायल तडवी आत्महत्याप्रकरणी दोषारोपपत्र सादर
SHARES

मुंबईतील बहुचर्चित डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १२०३ पानांचं दोषारोपपत्र तयार केलं असून  हे आरोपपत्र सत्र न्यायालयात सादर केलं जाणार आहे. यांत पायलच्या सुसाइड नोटचाही समावेश आहे. ही सुसाइड नोट पायलच्या मोबाइलमध्ये पोलिसांना आढळून आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी  २५ जुलै रोजी होणार आहे.

काय आहे सुसाईड नोटमध्ये?

मुंबईच्या नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डाॅ. पायल तडवीने २२ मे रोजी हाॅस्टेलमध्ये आत्महत्या केली होती. पायलच्या आत्महत्येचे पडसाद संपूर्ण राज्यभर उठले होते. पायलच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या तिन्ही महिला डाॅक्टर हेमा अहुजा, भक्ती मेहर, अंकिता खंडेलवाल यांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या पोलिसांना पायलच्या मोबाइलमध्ये तिने लिहिलेली ३ पानांची सुसाइड नोट आढळून आली. या सुसाइड नोटमधील हस्ताक्षर ही तिचेच असल्याचे पुण्याच्या हस्ताक्षरतज्ज्ञांनी केलेल्या तपासणीत पुढे आले आहे.  त्या सुसाइड नोटमध्ये तिने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केल्याप्रकरणी कुटुंबांची आणि नवऱ्याची माफी मागितली आहे.

१८० हून अधिक जणांचे जबाब

या दोषारोपपत्रात पोलिसांनी १८० हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आल्याचं कळतं. त्यात डाॅ. अहुजा आणि तडवीमध्ये झालेलं मोबाइल संभाषण, पायलसोबत शिक्षण घेणारे विद्यार्थी, पायलचे नातेवाईक, वरिष्ठ डाॅक्टरांचा जबाब हे महत्वाचे पुरावे पोलिसांनी दोषारोपत्रात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


हेही वाचा-

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाने दिली परवानगी

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: न्यायालयानं तिन्ही महिला डॉक्टारांचा जामीन अर्ज फेटाळला



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा