डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: न्यायालयानं तिन्ही महिला डॉक्टारांचा जामीन अर्ज फेटाळला

नायर रूग्णालयातील डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला आहे. आरोपींची न्यायालयीन कोठडीही न्यायालयानं १४ दिवसांनी वाढवली आहे.

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: न्यायालयानं तिन्ही महिला डॉक्टारांचा जामीन अर्ज फेटाळला
SHARES

नायर रूग्णालयातील डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला आहे. आरोपींची न्यायालयीन कोठडीही न्यायालयानं १४ दिवसांनी वाढवली आहे. तसंच, जामीन फेटाळल्याचं समजतात डॉ. हेमा अहुजा (२८), डॉ. अंकिता खंडेलवाल (२७) आणि डॉ. भक्ती मेहर (२६) यांना अश्रु अनावर झाले होते.

जामीन अर्जाला विरोध

राज्य सरकारकडून तिन्ही महिला आरोपींच्या जामीन अर्जला तीव्र विरोध करण्यात आला. या प्रकरणाचा तपास अत्यंत महत्वपूर्ण टप्प्यात असल्यानं आरोपींना जामीन देणं योग्य ठरणार नाही. अशी भूमिका राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे.

गळफास घेऊन आत्महत्या

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत असलेल्या डॉ. पायलनं २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या सिनिअर असलेल्या या तिन्ही डॉक्टरांकडून तिचं सातत्यानं रॅगिंग केलं जात होतं. तिच्याविरुद्ध जातीवाचक शेरेबाजी देखील केली जात होती. या जाचाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

न्यायालयीन कोठडी

याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी प्रथम डॉ. भक्तीला २८ मे रोजी अटक केली आणि त्यानंतर २९ मे रोजी डॉ. हेमा व डॉ. अंकिता यांना अटक केली होती. तेव्हापासून या तिघीही अटकेत आहेत. याप्रकरणी त्यांचे जामीन अर्ज फेटाळतानाच त्यांची न्यायालयीन कोठडी ६ जुलैपर्यंत वाढवली आहे.



हेही वाचा -

शिवसेनेच्या आ. नीलम गोऱ्हे बनल्या विधान परिषदेतील पहिल्या महिला उपसभापती



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा